विकासाने केला घात (एका खेड्याची विनाशाकडे वाटचाल अ विलेज अवेट्स् अ डूम्स डे ह्या जयदीप हर्डीकर लिखित पुस्तकाचा परिचय )
नर्मदाखोऱ्यातील लोकांच्या नर्मदा सरोवर प्रकल्पाविरोधातील लढ्यातील शक्तिशाली एक अर्थपूर्ण घोषणा आहे, ‘विकास चाहिये, विनाश नहीं’. मोठी धरणे म्हणजे विकास असे मानणाऱ्या अनेक शहरी भारतीयांना ही घोषणा चुकीची वाटेल. पण ‘सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीचा तुकडा किंवा जगण्याचे साधन गमावलेल्या आदिवासीचे किंवा शेतकऱ्याचे दुःख, हे शब्द नीटच मांडतात. मोठी धरणे, वेगवान आंतर-राज्य रस्ते, अभयारण्ये, विशेष आर्थिक क्षेत्रे अशा …